२४ सप्टेंबर रोजी जामसंडे येथे सत्यनारायण पूजेसह होणार उदघाटन सोहळा; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
देवगड,दि.२२ सप्टेंबर
देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. जामसंडे यांच्या वतीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (MNGL) सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या सीएनजी (CNG) पंपाचा भव्य शुभारंभ गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा शुभारंभ सोहळा देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, जामसंडे (तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) या कार्यक्रम स्थळी पार पडणार आहे. या मंगल प्रसंगी सकाळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११.०० नंतर भाविक व नागरिकांसाठी तीर्थ प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवर, सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अजित पांडुरंग गोगटे, व्हाईस चेअरमन रवींद्र तिर्लोटकर मॅनेजर कौस्तुभ जामसंडेकर तसेच सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.