मळई येथे रस्त्यानजिक असलेला महाकाय वटवृक्ष कोसळला
वादळी वाऱ्यामुळे पडझडीने मोठे नुकसान
देवगड,दि.०४ जुलै
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.हिंदळे येथे गोठ्यावर झाड कोसळून, कातवणेश्वर येथे गोठ्याची कंपाऊंड वॉल कोसळून नुकसान झाले.मळई येथे रस्त्यानजिक असलेला वटवृक्ष कोसळल्याने देवगड मळई मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.
हवामान विभागाने 3 ते 7 जुलैदरम्यान समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा तसेच मुसळधार पावसाचा इशारा दिला असूनशुक्रवारी देवगड तालुक्यात 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.वादळी वाèयामुळे हिंदळे येथील जनार्दन महादेव राणे यांच्या गोठ्यावर मोठे झाड कोसळून नुकसान झाले. तसेच कातवणेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गोठ्याची कंपाउंड वॉल कोसळून अंदाजे 22 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाèयामुळे मळई येथील कल्याण कणेरकर यांच्या घरानजिक असलेल्या वळणावर महाकाय वटवृक्ष जमीनदोस्त झाला. हा वटवृक्षामुळे वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे मळई भागातील वीज पुरवठा खंडित झाला. देवगडहुन मळईकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली.