देवगड,दि.१३ ऑगस्ट
देवगड स्पोर्ट्स क्लब आणि देवगड अँगलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या मिठमबरी बीच येथे फिशिंग टूर्नामेंट २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत ही स्पर्धा होणार असून, समुद्रातील मासेमारीचे कौशल्य आणि स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
या स्पर्धेत केवळ ३० स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश शुल्क ९९९ रुपये आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार १११ रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
याशिवाय स्पर्धेत पहिला कॅच, शेवटचा कॅच आणि सर्वाधिक कॅच यासाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे विशेष बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धकांची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी २० ऑगस्ट २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी ऋषिकेश – ८६९३८८८८१२, किरण – ८६६९८९८०८० आणि विनय – ९६०७०२९००३ यांच्याशी संपर्क साधावा.
३० स्पर्धक, एक समुद्र आणि विजेतेपदासाठी रंगणारा थरार, यामुळे या फिशिंग टूर्नामेंटकडे देवगडमधील मासेमारीप्रेमींचे लक्ष लागले आहे.