देवगड : नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड-जामसंडेत विविध लोकोपयोगी उपक्रम

शेअर करा

भाजपाच्या वतीने बेंचेस बसविणे, रेनकोट वाटप व गरजू महिलेला घरकुल हस्तांतरण

देवगड,दि. १० जून

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा देवगड-जामसंडे शहराच्या वतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जामसंडे गावचे ग्रामदैवत आई दिर्बादेवी मंदिर येथे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाने करण्यात आली. यानंतर प्रभाग क्रमांक १४ मध्ये योगेश पाटकर यांच्या सौजन्याने एका गरजू महिलेला घरबांधणीसाठी मदत करण्यात आली असून त्या घरकुलाचे हस्तांतरण करण्यात आले. तसेच रानडे कॉलनी आणि श्रीकृष्ण नगर परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्येकी एक अशा दोन बेंचेस बसविण्यात आल्या.
यावेळी एमएसईबी देवगड-जामसंडे येथील वायरमन कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक १ मधील खाडीकिनारी पर्यटक व नागरिकांच्या सोयीसाठी वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने दोन बेंचेस बसविण्यात आल्या.
याशिवाय आप्पासाहेब धर्माधिकारी सद्गुरू बैठक, जामसंडे येथे बसण्यासाठी दोन बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमासाठी वैभव करंगुटकर व दया पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रभाग क्रमांक ६ मधील तेलीवाडी बसस्टॉप येथे नागरिकांच्या सुविधेसाठी योगेश चांदोस्कर यांच्या सौजन्याने बेंच बसविण्यात आली.
या कार्यक्रमांना माजी आमदार अजितराव गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला पदाधिकारी प्रियांका साळस्कर, महिला शहराध्यक्षा तन्वी शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा