सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाचे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव श्री. विरेंद्र सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा दौरा उद्या शनिवारी निश्चित असताना ते पुर्वसंध्येला उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे होत्या. त्यांनी बोलण्यास नकार दिला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ पांडुरंग वजराटकर,राजू केळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर ट्रामा केअर सेंटर, आय सी यू, ओपीडी आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अँड नकुल पार्सेकर,रवी जाधव, अँड संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, किशोर चिटणीस, व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.