दोडामार्ग, दि. ९ जुलै
मोर्ले केर सीमेवर पंकज गवस यांच्या शेतमांगरात शिरकाव करून या ठिकाणी असलेल्या लहान कुञ्याच्या एका पिल्लाला लक्ष केलेल्या पंधरा फूट अजगराला अखेर वन कर्मचारी, यानी स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने जेरबंद करून या अजगराला तिलाही घाटात अरण्यात सोडण्यात आले.
पंकज गवस यांचा मोर्ले केर सीमेवर शेत मांगर आहे. या शेत मांगरात हा अजगर शिरला होता. सकाळी ते मांगरात आले असता आवाज आला म्हणून पुढे जाऊन पाहिले तर भला मोठा अजगर दूष्टीस पडला यावेळी एक कुञ्याच्या पिल्लाला लक्ष केले हे आढळून आले. गवस यांनी वन विभाग तसेच गोपाळ गवस याला माहिती दिली या नंतर वन विभाग टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या अजगराला पकडून पुन्हा तिलाही घाटात सोडण्यात आला.
चार कुञ्याची पिल्ले होती.