Dodamarg : दोडामार्गातील हत्ती संकटावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी ५० कोटींचा रेल्वे बॅरिकेड प्रस्ताव

शेअर करा

कर्नाटकच्या धर्तीवर हत्तींसाठी नैसर्गिक अधिवास; हत्ती पकड मोहिमेसाठी बाधित गावांनी ठराव सादर करावेत – आ. दीपक केसरकर

दोडामार्ग, दि. ५ आॅक्टोबर

दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवांची हत्ती संकटातून मुक्तता करण्यासाठी कर्नाटक धर्तीवर
हत्तींसाठी नैसर्गिक आदिवास निर्माण करुन हत्ती स्थिर राहाण्यासाठी अधिवास क्षेञा बाहेर हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी पन्नास कोटी रुपये खर्च करून रेल्वे बॅरिकेड प्रस्ताव
सरकारला सादर केला जाणार आहे. अशी माहिती आम. दिपक केसरकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उप वनसंरक्षक शर्मा, सहाय्यक उपवनसंरक्षक बोराटे, यांनी शेतकरी यांच्या बैठकीत दिली. हत्ती पकड मोहीम बाबत हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. जर हत्ती बाधित गावातील शेतकरी बांधवांनी हत्ती उपद्रव बाबत पकड मोहीम आवश्यक आहे असे ठराव सादर करण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन आम. दिपक केसरकर यांनी शेतकरी बैठकीत केले.
दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त झाला पाहिजे यासाठी २ आॅक्टोबर रोजी पाळये या ठिकाणी उपोषण केले होते. ते उपोषण आम दिपक केसरकर यांच्या सूचना नुसार मागे घेतले
दोडामार्ग येथे सोमवारी वन अधिकारी समवेत बैठक घेण्यात येईल असे सांगितले होते. त्या नुसार सोमवारी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे पाळये तसेच इतर गावातील शेतकरी यांची बैठक पार पडली.
यावेळी आम. दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षक शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक बोराटे, दोडामार्ग पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस,
कसर्ई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर, दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील, शेतकरी संघटना अध्यक्ष संजय देसाई, हत्ती हटवा कृती समिती अध्यक्ष गणपत दळवी, दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबई कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर, सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, भगवान गवस, दत्ताराम देसाई, राजाराम देसाई, हर्षद देसाई, रघुवीर शेलार,विठ्ठल दळवी, झेंडे, इतर शेतकरी उपस्थित होते.
झालेल्या बैठकीत शेतकरी बांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या २३ वर्षात फक्त आश्वासन कृती काही नाही. तेव्हा नुकसान रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना झाली पाहिजे. उपोषण आंदोलन केले की तेवढया पुरती आश्वासन देऊन उठवले जाते पण यापुढे असे होताकामा नये

शेअर करा