दोडामार्ग : विजघर चेकपोस्टवर कारवाई; गोवा बनावटीची दारू जप्त

शेअर करा

कारमधून कर्नाटकात अवैध वाहतूक; ३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात

दोडामार्ग, दि. २४ जून

गोवा राज्यातून मोठया प्रमाणात गोवा बनावटीची दारू अवैध रित्या घाटमाथ्यावर कर्नाटक राज्यात नेली जाते, अशा प्रकारे गोवा बनावटीची दारू एका कार मधून कर्नाटक मध्ये नेली जात आहे. ही टीप विजघर चेकपोस्ट या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस सुरेश जाधव, तसेच इतर पोलिसांनी विजघर चेकपोस्ट या ठिकाणी प्रत्येक वाहन तपासणी करत असताना एका कार मध्ये गोवा बनावटीची विविध कंपन्या दारू आढळून आली. त्याची किंमत पन्नास हजारच्या आसपास तसेच वाहतूक करण्यासाठी वापर केलेली
रिज कार असा एकूण ३ लाख ३८,१६० रुपये मुद्देमाल जप्त करून
राजू प्रेमानाथासा बाळके धारवाड हुबळी हेरोरी याला ताब्यात घेतले.
मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यानी दिली.
गोवा राज्यातील गोवा बनावटीची दारू दोडामार्ग मधून पोलिसांच्या नजरा चुकवून घाटमाथ्यावर नेली जाते. उन्हाळ्यात अनेक चोरटया मार्गाचा वापर केला जातो. मंगळवारी रात्री विजघर चेकपोस्ट या ठिकाणी सुरेश जाधव तसेच सहकारी याना कारचा संशय आला म्हणून कार तपासणी केली असता आत मध्ये गोवा बनावटीची दारू सापडून आली. ही माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली या नंतर पोलिसांच एक पथक विजघर चेकपोस्ट येथे येऊन संशयित आरोपी कार दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या धडक कारवाई मुळे चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.

शेअर करा