निकृष्ट कामे, बोगस ठेकेदारी व अपूर्ण कामांचे बिल काढल्याचा संतोष नानचे यांचा आरोप; एम-सॅन्ड प्रकल्पासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा उपनगराध्यक्षांचा दावा
दोडामार्ग, दि. २९ सप्टेंबर
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभा मंगळवारी नगराध्यक्ष अनुपस्थितीत असल्याने उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली नगरपंचायत मध्ये झालेली कामे निकृष्ट दर्जाची तसेच ओरिजिनल ठेकेदार बाजूला ठेवून डूबलिकेट ठेकेदार यांनी टक्केवारी देऊन कामे करून घेतली. तलाव तसेच नमो गार्डन घोटाळा, तसेच नगरपंचायत इमारत बांधकाम बोगस निकृष्ट दर्जाचे चिरे वापरले गेले. काम अपूर्ण असताना ८०टक्के बिल काढले असा आरोप विद्यमान नगरसेवक माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. आयत्या वेळी आलेल्या विषयात सभा अध्यक्ष उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांनी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात विरोध झालेला एमसॅन्ड प्रकल्प उभारला जात आहे यासाठी २५ लाख रुपये घेतले असा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली
यावेळी संतोष नानचे रामचंद्र ठाकूर यांनी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. सभा अध्यक्ष देवीदास गवस यांनी एमसॅन्ड प्रकल्प जे बांधकाम इतर कामे तातडीने जमीनदोस्त करावी असा ठराव बैठकीत घेतला.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभा कित्येक महिन्यांनंतर
खडाजंगी बघायला मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत ही बैठक उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि उपस्थित नगरसेवक, नगरसेविका मधिल काही जणांनी नगरपंचायत कारभार निकृष्ट कामे नगरपंचायत कर्मचारी ठेकेदार यांची पाठराखण करतात निकृष्ट दर्जाचे काम करुन टक्केवारी घेतात एकही काम पारदर्शक नाही एक दिड वर्षात रस्ते खराब याचा पाढाच वाचला यावेळी संतोष नानचे रामचंद्र ठाकूर, पांडुरंग बोर्डेकर यांनी आक्रमक मुद्दे उपस्थित करत बैठक चांगली गाजवली अनेक प्रश्न उत्तर देण्यास नगरपंचायत कर्मचारी अपयशी ठरले.
दोडामार्ग तिलारी मार्गावर जे तळी बांधकाम केले या ठिकाणी अगोदर काम संतोष दळवी यांनी केले होते याच ठिकाणी काम करून विहिरीचे दगड आणून काम केले दहा लाख खर्च त्या ठिकाणी ४२ लाख यात काय वापरलात जर विहिरीचे दगड वापरले नाही तर काढले तर ते गेले कुठे याचे उत्तर दिले नाही. बोकाळलेल्या टक्केवारी मुळे निकृष्ट दर्जाचे काम करून नगरपंचायत कसर्ई दोडामार्ग नाव खराब केले जात आहे. असा आरोप बैठकीत संतोष नानचे रामचंद्र ठाकूर यांनी केला.
नगरसेवक आक्रमक डुबिलिकेट ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम बोकाळलेली टक्केवारी वरुन घमासान बघायला मिळाले.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभेस उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, रामराव गावकर, पांडुरंग बोर्डेकर, संजना म्हावळणकर, ज्योती जाधव, वासंती मयेकर, राजेश प्रसादी, स्वराली गवस, क्रांती जाधव,
रामचंद्र मणेरीकर, नितीन मणेरीकर, तसेच नगरपंचायत कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
मासिक बैठक सुरुवातीला नगरपंचायत कर्मचारी फोन घेत नाही याकडे लक्ष वेधले यावेळी सभा अध्यक्ष देवीदास गवस यांनी नगरसेवक नगरसेविका यांचे फोन उचललेले पाहिजे अशा सूचना केल्या. आपण सुचवलेल्या कामात भ्रष्टाचारी नगरसेवक सूचक नको असे संतोष नानचे यांनी बैठकीत सांगितले. मुळ ठेकेदार बाजूला करून दबावतंञ आणून काम करणे सोडा जे डूबलिकेट ठेकेदार आहेत ते नगरपंचायत सदस्य आहेत ते काम करू शकत नाही मग कामे कशी करतात असा सवाल उपस्थित केला. दबावतंञ आणून काम करता येणार नाही काही महिन्यात निवडणूका आहेत मी पुन्हा येईन असे सांगितले.
काही प्रसंग आले की खूर्ची सोडावी लागते
नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी सभा अध्यक्ष याना सवाल केला मासिक सभा असताना नगराध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थितीत का? असा सवाल केला याला उत्तर देताना उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांनी काही प्रसंग आले की खूर्ची सोडावी लागते. असे सांगितले.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये सफाई कामगार यांचे पीएफ तसेच काही महिने पगार दिला गेला नाही. ते कामगार घाण गोळा करतात त्यांचे पैसे खातात यात पैसे खाण्यात अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत याची चौकशी झाली पाहिजे का? पगार दिला नाही. हा मुद्दा रामचंद्र ठाकूर संतोष नानचे यांनी उपस्थित केला.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये सर्व कामे निकृष्ट दर्जाची केली जातात एकच ठेकेदार डूबलिकेट ठेकेदार कडून कामे हा काय प्रकार सुरू आहे