शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप; लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन
दोडामार्ग ,दि.१३ ऑगस्ट
काही वर्षापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना असा प्रवास करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेते नारायण राणे दहशत निर्माण करतात असे गंभीर आरोप करणारे आम. दिपक केसरकर यांनी लावलेल्या आमसभेत प्रत्येक नागरिक याला प्रश्न विचारणे लोकशाहीचा अधिकारी आहे. असे प्रश्न विचारला म्हणून शिवसेना शिंदे पदाधिकारी सरळ हल्ला करतात हा दहशवात दिपक केसरकर याना दिसत नाही. असा सवाल राष्ट्रीय काँग्रेस दोडामार्ग येथील पदाधिकारी कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर यांनी केला. इतर जिल्ह्यातील दहशवात संकृती दिपक केसरकर यांचे कार्यकर्ते करतात हे आम दिपक केसरकर यांनी ध्यानात ठेवावे ही लोकशाही आहे.
दोडामार्ग तालुका आमसभेत गुरूवारी जो राडा शिवसेना शिंदे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी दोडामार्ग तालुक्यातील जनते समोर जे कृत्य केले हे काळीमा फासणारे आहे. नारायण राणे दहशत निर्माण करतात असे बेजबाबदार आरोप करणारे
दिपक केसरकर यांनी हीच शिकवण शिवसेना शिंदे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिली.
आमसभा अकरा वर्षे झाली नाही यामुळे या सभेत विरोधक आमदार यांचे दुर्लक्ष वाढत्या समस्या यामुळे धारेवर धरणार गोंधळ होणार तेव्हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शिवसेना शिंदे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा राडा घडवून आणला असा आरोप कृष्णा धाऊसकर यांनी केला. हे केल्याने इतर विरोधक गोंधळ घालणार नाही गप्प बसतील हा हेतू आम दिपक केसरकर यांच्या कार्यकर्ते यांचा होता. हा हेतू होता. यामुळे दिपक केसरकर यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी लोकशाहीची थट्टा केली आहे. असा आरोप कृष्णा धाऊसकर यांनी केला.