पिंपळेश्वर चौकात रिक्षा उभ्या करण्यास अडचणी; नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.
दोडामार्ग, दि. ६ जुलै
दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात अनेक रिक्षा चालक रस्ता कडेला रिक्षा लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही वेळा रस्त्यावर रिक्षा लावायला मिळत नाही. रिक्षा स्टॅण्ड नसल्याने मोठी गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिक्षा चालक, कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग सहाय्यक शाखा अभियंता संभाजी घंटे यांची भेट घेऊन दोडामार्ग येथे रिक्षा स्टॅण्ड करिता जागा उपलब्ध करून द्या असे निवेदन दिले.
यावेळी रिक्षा चालक संतोष हळणकर, राजन देसाई, रामचंद्र हरमलकर. संजय मनेरीकर, गुरु हळणकर, विनय हळणकर, इतर रिक्षा चालक उपस्थित होते.