दोडामार्ग येथील बळीराजा अग्रेसर सर्व्हिसेस कृषी सेवा केंद्राचे वेदीका परब यांच्या हस्ते शुभारंभ

शेअर करा

दोडामार्ग,दि.०९ ऑगस्ट

दोडामार्ग येथे मिता ओंकार मयेकर यांनी बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस” या नवीन कृषी सेवा केंद्र सुरू केले या केंद्राचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन सौ. वेदिका परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणा आणि उर्जा लाभली.

यावेळी वेदिका परब यांनी बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेसच्या टीमला त्यांच्या भावी यशस्वी व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन, साधने व सेवा उपलब्ध होणार असून, याचा निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा लाभ होईल.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शेतकरी बांधव आणि तसेच
माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस,सुहास दळवी,शिरिष नाईक, केंद्रांचे मिता ओंकार मयेकर , ज्ञानेश्वर मयेकर, माजी सभापती सौ दिपीका मयेकर, सौ मिता मयेकर, शेतकरी लक्ष्मण गुळेकर, संचालक गणपत देसाई , चेतना गडेकर, तन्मया राणे,संजू उसपकर, महेश गवस,अनिल मोरजकर, सत्यवान धरणे, विनिता देसाई,सोमा धरणे, राजाराम मयेकर, विलास सावंत, उदय सावंत, हर्षद सावंत, भगवान गवस, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

दोडामार्ग पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, यांनी भेट दिली.

शेअर करा