दोडामार्ग तालुक्यातील बंधारा घोटाळा प्रकरणी आम. निलेश राणे कडून जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्यासाठी निवेदन

शेअर करा

दोडामार्ग,दि.२५ जून
प्रधानमंत्रीकृषी सिंचन पाणलोट विकास घटक योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधारा बांधण्यात मध्ये कोटयावधी रूपये घोटाळा झाला आहे. अनेक ठिकाणी बंधारे तडे गेले आहेत. याबाबत लवू कदम,, देवदत्त केसरकर सामाजिक कार्यकर्ते यांनी आम. निलेश राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधले या नंतर आम. निलेश राणे यांनी बंधारा बांधकाम घोटाळा बाबत सखोल चौकशी करावी यासाठी निवेदन दिले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाणलोट क्षेत्र अंतर्गत बंधारा बांधकाम मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एकही बंधारा काम नियमात नाही कुठेही वाळू वापर नाही. पंधरा ते वीस लाख रुपये खर्च दाखवला . प्रत्यक्ष दोन लाख ते तीन लाखाचे जाग्यावर काम अनेक ठिकाणी बंधारा बांधकाम केले नाही पण बोगस संस्था नावाखाली बिले उखळली. हा घोटाळा उघडकीस येताच लवू कदम, देवदत्त केसरकर यांनी हा विषय उचलून धरला होता संबंधित अधिकारी योग्य माहिती देण्यास देखील असमर्थ ठरले होते.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात बंधारा बांधकाम घोटाळा झाला आहे. तसेच सावंतवाडी इतर तालुक्यातील गावात पाणलोट क्षेत्र प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत बंधारा बांधकाम घोटाळा झाला आहे.
नुकतीच बंधारा बांधकाम घोटाळा प्रकरणी लवू कदम, देवदत्त केसरकर यांनी आम. निलेश राणे यांची भेट घेतली. आणि दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात बंधारा बांधकाम मध्ये कोटयावधी रूपये घोटाळा झाला आहे. बंधारा तडे गेले आहेत. एकही बंधारा बांधकाम नियमात नाही. हे लक्षात आणून दिले.
बंधारा बांधकाम मध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच गाव पातळीवर बंधारा बांधकाम करणारी मंडळी जबाबदार आहेत. पावसाळ्यात अनेक बंधारे जाग्यावर राहाणार नाही. बंधारा बांधकाम केले ते बंधारे कोरडे होते पाणी नाही सर्व नियम धाब्यावर बसवून शासनाच्या कोटयावधी रूपये खर्च बंधारा बांधकाम नावाखाली घोटाळा झाला आहे. ही बाब निदर्शनास आणून दिली.
आम. निलेश राणे यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना लेखी पञ दिले आणि ते जिल्हाधिकारी यांना देऊन चौकशी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

शेअर करा