दोडामार्ग, दि.१० जून
दोडामार्ग ते विजघर मार्गावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण केली नाही याचा फटका वाहन धारकांना बसायला सुरूवात झाली आहे. पहिल्या पावसात मेढे येथे रस्ता अपुरे काम पुलाच्या जोड रस्ता पर्यंत सिमेंट काँक्रिट दुसरी लाईन पुर्ण केली नाही यामुळे या ठिकाणी चिकलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्ता या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहने ये जा करतात या रस्त्यावर बेळगाव येथून दोडामार्ग कडे येणारी कार चिकल रस्ता यामध्ये अडकून पडली. अखेर स्थानिक ग्रामस्थ यांनी मदत करत कार बाहेर काढली. ठेकेदार यांच्या अपूर्ण कामाचा नाहक फटका वाहन धारकांन
नागरीकांना सहन करावा लागत आहे.