दोडामार्ग : झरे सरगवे-2 मध्ये रस्त्यासाठी ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तीव्र; उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली

शेअर करा

तिलारी धरणग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतीतील रस्ता खुला करण्याची मागणी; उपचाराचा डॉक्टरांचा सल्ला धुडकावून ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार.

दोडामार्ग,दि.०१ जुलै

तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या सरगवे गावातील धरणग्रस्त यांचे झरे सरगवे दोन मध्ये पुनर्वसन करण्यात आले. या ठिकाणी ख्रिस्ती बांधवाना भूखंड दिले, घर बांधले रस्ता दिला. पण हा रस्ता काही जणांनी बंद केला तो खुला करण्यासाठी पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग कडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही म्हणून ख्रिस्ती बांधवांनी ग्रामपंचाय कार्यालय ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे.बुधवारी सकाळी आरोग्य तपासणी दरम्यान कयतान डिझोजा प्रकृती खालावली हे लक्षात आले. डॉ. पाटील यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली पण जोपर्यंत संबंधित अधिकारी ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. संबंधित अधिकारी गायब झाले आहेत यामुळे उपोषण कर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेअर करा