राम मंदिरातील कथित देणगी लूटप्रकरणी निषेध; अध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीविनायक मंदिरात आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
दोडामार्ग, दि. ९ जुलै
अयोध्या येथील श्रीराम मंदिरात
रोख रक्कम, सोना, चांदी, जे भक्तांनी दान केले याची लुट झाली आहे यामुळे देशभरात रामभक्त हिंदू बांधव कडून या लुटीचा निषेध करून लुटारूवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या राम मंदिरातील लुट प्रकरणी गुरुवारी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेस वतीने सिध्दीविनायक मंदिरात अध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव सत्याग्रह करण्यात आला यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
करोडो लोकांचे दैवत श्री राम मंदिरातील लुट प्रकरणी अद्याप तेथील सरकारने हवी तशी कारवाई केली नाही. मुख्य लोक आजही मोकळे आहेत सरकार पाठीशी घालत आहेत असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह सुरू करण्यात आला.
दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह आंदोलन वेळी
जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे तालुकाध्यक्ष बाबू गवस संतोषकुमार दळवी जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक सुभाष दळवी सुधीर चांदेलकर सुधीर गवस श्रीकृष्ण गवस संदीप नाईक सोनू गवस मोहन गवस बाबाजी सावंत सुशांत बोंद्रे दिनानाथ उगवेकर मदन सावंत तुकाराम नाईक विजय हेरेकर देवानंद हजारे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
