Dodamarg : तिलारी धरण असूनही झरेबांबरला कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा!

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांनी मांडली व्यथा; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

दोडामार्ग, दि. १७ आॅक्टोबर

दोडामार्ग तालुक्यात तिलारी सारखा मोठा धरण प्रकल्प असून देखील तालुक्यातील अनेक गावात कालव्याचे पाणी मिळत नाही. झरेबांबर गावात कालव्याचे पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभाग कडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नाही . अशी कैफियत झरेबांबर गावातील जेष्ठ ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेटकर , तसेच शिवसेना पदाधिकारी माजी उपसभापती राजेंद्र निंबाळकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या झरेबांबर दौऱ्यात निदर्शनास आणून दिले. यावेळी राणे यांनी आपण लवकरच तिलारी जलसंपदा विभाग अधिकारी समवेत बैठक घेऊन झरेबांबर इतर गावांना पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज झपाट्याने प्रगती होताना दिसत आहे. तिलारी सारखा मोठा प्रकल्प आहे. या धरणाचे डावे उजवे कालव्याचे बांधकाम करताना अनेक गावे वगळली यामुळे शेती प्रधान गावे वंचित राहिली. पाणी नसल्याने शेती बागायती उन्हाळी शेती करु शकत नाही.
झरेबांबर गावात वनराई बंधारा उपक्रम दरम्यान पालकमंत्री नितेश राणे गावात आले यावेळी झरेबांबर पंचक्रोशीतील गावात तिलारी कालव्याचे पाणी मागणी असून मिळत नाही या गंभीर समस्येवकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले यावेळी आपण लवकरच जलसंपदा विभाग अधिकारी समवेत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू पाणी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राणे यांनी दिली.

शेअर करा