दोडामार्ग : साटेली भेडशी केंद्रशाळेचे दुहेरी यश

शेअर करा

शिष्यवृत्ती परीक्षेत खुशी धर्णे तालुक्यात प्रथम,जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत २८ वी

१४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण,शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे वाखाणण्याजोगे यश

दोडामार्ग, दि. १२ आॅगस्ट
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत साटेली भेडशी पूर्ण प्राथमिक शाळा क्र.१ ची विद्यार्थिनी खुशी सत्यवान धर्णे दुहेरी यशाची मानकरी ठरली . खुशीने ग्रामीण विभागातून ८२ टक्के गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक,तर जिल्हा गुणवत्ता यादीत २८ वा क्रमांक पटकावला आहे .खुशी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने तिचे यश नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
दरम्यान ,खुशीसह १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून या यशाने साटेली भेडशी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका नूतन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, मुख्याध्यापक पूनम पालव,पदवीधर शिक्षक दीपक दळवी, संपदा दळवी,सीमा कांबळी,मिलन पाटील,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत धर्णे , माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष अरविंद धर्णे,माजी केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक,केंद्रप्रमुख दत्ताराम दळवी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
………………………..

साटेली भेडशी शाळेचे यशवंत विद्यार्थी

  • खुशी सत्यवान धर्णे
  • कृष्णा महादेव दळवी
  • अन्वी नारायण बुडके
  • गार्वी गुरुदास देसाई
  • रुद्र राज केरकर
  • भार्गवी रवींद्र पारधी
  • आराध्या सुरेश राठोड
  • सार्थक विजय तानवडे
  • महादेव परशुराम धर्णे
  • पारस प्रेमानंद कुबल
  • पावनू प्रसन्ना पाटील
  • बाळकृष्ण वैभव सुतार
  • निधी शिवानंद गवस
  • सावी नितीन गाड विद्यार्थी उत्तीर्ण झाले

डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत चौथीतील 22 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या परीक्षेतही खुशी सत्यवान धर्णे ही तालुक्यात पहिली आली आहे.

शेअर करा