दोडामार्ग : साटेली भेडशी बाजारपेठ ते करुणा सदन विद्यालय गटारे गाळाने भरली संबंधित ठेकेदार यांचे दूर्लक्ष

शेअर करा

दोडामार्ग,दि.०४ ऑगस्ट

साटेली-भेडशी बाजारपेठ ते करुणासदन या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूंची गटारे मातीने पूर्णपणे भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, परिसरात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.तेव्हा तातडीने गटारांची साफसफाई संबंधित ठेकेदार याने करावी अशी मागणी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांनी केली आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून, पायी जाणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.
याबाबत रस्ते विकास महामंडळाने तातडीने दखल घेऊन दोन्ही बाजूंची गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी साटेली-भेडशीच्या उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न लावता आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

शेअर करा