दोडामार्ग : झरेबांबर येथील माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची कोकण विभाग सह संपर्क प्रमुख म्हणून निवड

शेअर करा

दोडामार्ग, दि. ८ सप्टेंबर

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कोकण विभाग सहसंपर्क प्रमुख पदी माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली. जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणूनही निवड झाली. भाजपा अनुसूचित जाती प्रदेश कार्यकारणी अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड व सरचिटणीस तथा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी ऍड. माधवीताई यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचेनुसार आज जाहीर केली.


महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी अनुसूचित जाती साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंकुश जाधव माजी समाजकल्याण सभापती यांची निवड करण्यात आली शिवाय त्यांच्याकडे कोकण विभाग सहसंपर्क प्रमुख पदाची ही जबादारी देण्यात आली आहे. जाधव हे आक्रमक व अभ्यासू म्हणून जिल्ह्यात परिचित आहे.समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी समाजकल्याण विभाग सक्षम करत विकासाच्या बाबतीत चर्चेत आणला होता. आजही समाजकल्याण विभागाला नवी ओळख देणारे सभापती अंकुश जाधव म्हणून सर्वसामान्य जनतेत आणि प्रशासनात त्यांची वेगळी ओळख आहे. जाधव यांच्या निवडीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा