दोडामार्ग : सासोली येथील जमीनीत पुन्हा उत्खनन ग्रामस्थ सपाटीकरण रस्ते दोडामार्ग तहसीलदार यांची परवानगी घेऊन कंपनीकडून स्पष्ट

शेअर करा

दोडामार्ग, दि. १२ जुलै

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील काही एकर जमीनीत पावसाळ्यात जेसीबी पोकलेन मशीन लावून रस्ते तयार केले जात आहे. असा आरोप सासोली येथील ग्रामस्थ यांनी केला आहे. याबाबत संबंधित कंपनीने सदर रस्ते सपाटीकरण हे दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्याकडून अधिकृत परवानगी तसेच दंडाची रक्कम भरणा करुन कामकाज सुरू केले आहे. हे करत असताना या ठिकाणी झाडांची देखील काळजी घेतली जात आहे. काही जण जाणूनबुजून कंपनीच्या विरोधात तक्रार करत आहेत. असे सांगितले, अंकित यशपाल कंसल गौरव दत्ताराम बिडये यांनी केलेल्या अर्जानुसार परवानगी दिली आहे. असे सांगण्यात आले.


सासोली गावातील ग्रामस्थ रविवारी सासोली येथील सामायिक जमीनीत गेले असता पावसाळ्यात या ठिकाणी मशीन लावून रस्ते तसेच कडेला उत्खनन केले जात आहे. दोन मशीन सुरू आहेत हे आढळून आले. काही किलोमीटर रस्ते तयार केले आहेत यामुळे सासोली येथील सुरू असलेल्या उत्खनन बाबत सासोली येथील ग्रामस्थ यांनी हे प्रकार थांबले पाहिजे अशी मागणी केली आहे.


सासोली येथील ग्रामस्थ यांनी जमीनीत सुरू असलेल्या रस्ते तयार करणे माती बाजूला करणे याबाबत कंपनीशी संपर्क साधला असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम केले जात नाही. एप्रिल मे मध्ये शासकीय राॅयल्टी भरून परवानगी घेतली आहे.
सासोली येथील जमिनीमध्ये, जमिन लागवड योग्य करण्यासाठी व सदर मिळकतीचा विकास करणे, गटार, रस्ते, खुले क्षेत्र व सुविधा क्षेत्र तयार करणेसाठी जमिनीच्या उंच भागातील माती जेसीबीच्या सहाय्याने सखल भागात व खड्यात टाकून जमिन सपाटीकरण करणेसाठी ५०० ब्रास माती उत्खनन करण्यास मंजूरी देण्यात आली


सदर परवानगी देताना
सर्व्हे नं. १७१/१/१ मध्ये ५०० ब्रास माती उत्खनन करुन सपाटीकरण करण्यात यावे. तसेच अन्य सर्व्हे नंबरमध्ये उत्खनन करता येणार नाही. अशी अट घातली आहे. असे सांगितले. तसेच तहसीलदार कडून घेतलेली परवानगी प्रत सादर केली.
दरम्यान सासोली गावातील ग्रामस्थ यांनी याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

शेअर करा