दोडामार्ग : साटेली गावात गौराईचे आगमन

शेअर करा

सुहासिनी महिलांनी हौसा घेऊन एकमेकांना भेटून गावातील मंदिरात जाऊन घेतले दर्शन

दोडामार्ग, दि. १८ सप्टेंबर

साटेली गावात दरवर्षी पाचव्या दिवशी गावात गौरी देवीचे आगमन होते. शुक्रवारी साटेली गावात काही अडचण निर्माण झाल्याने अनेक जणांना घरी गौरी आगमन करता आले नाही. पण गावातील काही महिला सुहासिनी यांनी विहिरीवर जाऊन देवी गौराईचे पाणी जाऊन आणले गौरी गणपती, महादेव, यांचे घरी पूजन करण्यात आले. यावेळी घरात महिलांची हौसा पंरपरा आहे. ती देखील पार पाडली. गणपती गौरी समोर विविध फळे इतर वस्तू यांनी हळदीच्या पानावर भरलेले हौसे याचे पूजन करून नंतर गावातील ग्रामदेवता श्री देवी सातेरी, देवी शांतादुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन सुहासिनी महिलांनी एकमेकांना हौसा देऊन आशिर्वाद घेतले.
साटेली गावात पाचव्या दिवशी गौरी आगमन प्रथा अनेक पिढया चालत आली आहे. अनेक महिला नऊवारी साडी परिधान करून अलंकार चढवून विहिरीवर धार्मिक पूजाअर्चा करून देवी गौराईचे पाणी आणले जाते पाणी कलशात भरून नंतर तोडांत चुळ भरून तसेच न बोलता आवंढा न गिळता चुळ भरलेले पाणी तसेच तोडांत ठेवून घरी गौरी पूजन आसन ठिकाणी गौराईचे पाणी कलश ठेवल्यावर तोंड उघडले जाते.

साटेली गावात गणेश चतुर्थी सणात पाचव्या दिवशी पहाटे गावात दु खद घटना घडली यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या काही जणांना गौराईचे पाणी आणता आले नाही. पण इतर जणांनी हे व्रत पूर्ण करून गौराईचे थाटात पूजन केले.

शेअर करा