दोडामार्ग, दि. १७ जून
गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक चालत आलेल्या दशावतार नाटक क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या कोनाळ गावातील एक प्रसिद्ध कलाकार सुभाष लोंढे
यांची कन्या मेनो रेल पायलट झाली म्हणून, तिचा सत्कार तसेच उत्कृष्ट दशावतार कलाकार म्हणून नुकताच दोडामार्ग येथे एका कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुभाष लोंढे विविध दशावतार नाटक कंपनी मधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. नारदमुनी ही भूमिका त्यांनी कमाल केली आहे. शिवाय त्यांची एक कन्या मेनो रेल पायलट झाली आहे. तिचा गौरव सुभाष लोंढे यांचा सत्कार हे कार्यक्रम जुळवून आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी, तुप्ती घोडमिसे, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उप नगराध्यक्ष देवीदास गवस, जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, इतर उपस्थित होते.