कोटींच्या खनिज माती चोरीच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्र अधिकाऱ्यांची भेट; महसूल विभागाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
दोडामार्ग, दि. ९ जुलै
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योग ऐवजी भलतेच उद्योग सुरू होते. गेल्या काही महिन्यात शेकडो डंपर खनिज युक्त माती चोरी करण्यात आली याची किंमत कोटीच्या घरात जाते यावरून आडाळी औद्योगिक विकास क्षेत्र चांगलेच गाजले होते. महसूल विभाग यांच्यावर ताशेरे ओढले जातात होते उद्योग मंत्री पर्यंत हा विषय गेला होता या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कोकण परिक्षेञ अधिकारी यांनी पाहणी केली.
खनिज सदृश्य माती चोरीच्या पार्श्वभूमीवर आज कोकण परीक्षेत्र IG नी आडाळी MIDC ला भेट दिली..यावेळी त्यांनी midc तील क्षेत्राची पाहणी केली..यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत, पोलीस निरीक्षक खोपडे, तहसीलदार राहुल गुरव, सरपंच पराग गांवकर उपस्थित होते..ig नी खनिज सदृश मातीच्या उतखनन, midc तील प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग..याची माहिती घेतली..यावेळी तहसीलदार गुरव यांना चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करा, कोणती कारवाई केलात त्याचा अहवाल द्या असे सांगितले..सरपंच गांवकर यांनीही MIDC तील सुरक्षितता, संभाव्य चोरी व अन्य गैर प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आपण द्याव्यात अशी मागणी आडाळी सरपंच पराग गावकर याने केली.
