दोडामार्गात पावसाचा तडाखा; वीज व्यवस्था आणि रस्त्यांचे मोठे नुकसान

शेअर करा

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली; वाहतूक विस्कळीत, वीज खांब रस्त्यावर पडल्याने साटेलीतील युवक गंभीर जखमी

दोडामार्ग, दि. ७ जुलै

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अनेक गावात झाडे पडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी झाडे मुख्य रस्त्यावर पडून वाहतूक बंद झाली. साटेली परमे रस्त्यावर मारूती मंदीर ठिकाणी मुख्य रस्त्यावर वीज वाहिन्यांवर झाड पडून खांब रस्त्यावर पडले. वीज महावितरण कर्मचारी यांनी खांब बाजूला केले नाही यामुळे सोमवारी रात्री अंधारात मोटार सायकलची खांबाला धडक बसून साटेली गावातील युवक गंभीर जखमी झाला त्याला गोवा येथे हलविण्यात आले. कुंब्रल येथे घरावर नारळाचे झाड पडून नुकसान झाले. कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर मोठे झाड पडून वाहतूक बंद झाली. दोडामार्ग ते विजघर मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. वीज वाहिन्या तुटल्या काही ठिकाणी खांब देखील पडले आहेत.


दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात सोमवारी मंगळवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वीज पुरवठा खंडीत यामुळे मोठी गैरसोय झाली. सोसाट्याचा वाऱ्यासह अनेक झाडे पुन्हा वीज वाहिन्या पडून अनेक ठिकाणी वीज खांब मोडून पडले यामुळे साटेली भेडशी गावातील वीज पुरवठा खंडीत होऊन गेले चार दिवस पाणी पुरवठा खंडीत झाला आहे यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
सोमवारी कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर भले मोठे झाड पडले यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला यामुळे काही वाहने सासोली येथून वळवली नंतर ग्रामस्थ हे झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले.
आपत्ती व्यवस्थापन याना कळवून झाड बाजूला करावे अशा सूचना शिवसेना ठाकरे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली.
सोमवारी रात्री उशिरा


दादू यशवंत गवस कुंब्रल राहत्या घरावर माडाचे झाड पडून प्रचंड नुकसान झाले आहे दोडामार्ग ते विजघर मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडीत होऊन वाहतूक व्यवस्था देखील कोलमडून पडली यामुळे अनेक ठिकाणी गैरसोय झाली. मंगळवारी दुपारी नंतर पावसाने काहीशी विशांती घेतली. तसेच प्रशासकीय यंत्रणा झालेले नुकसान याचा आढावा घेत होते

शेअर करा