दोडामार्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर खनिज उत्खनन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

शेअर करा

दोडामार्ग, दि. २८ मे

आडाळी औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या चोरटया खनिज उत्खनन शिवसेना पदाधिकारी यांनी केली
पाहणी शनिवारी घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची घेणार भेट त्या आकाचा बंदोबस्त करणार येथील अवैध उत्खनन पूर्ण बंद करणार
उद्योग मंत्री उदय सामंत याना माहिती दिली नाही
गणेशप्रससाद गवस

दोडामार्ग, दि. २८ मे प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील बेकार युवक युवती याना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी आडाळी औद्योगिक क्षेत्र उभारण्यात आले. पण या ठिकाणी संबंधित अधिकारी महसूल अधिकारी यांच्या आशिर्वादाने खुले आम खनिज उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. पण संबंधित यंत्रणा कारवाई करत नाही दिवसेंदिवस चोरटे खनिज उत्खनन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी शिवसेना पदाधिकारी यांनी आडाळी औद्योगिक क्षेत्रात भेट देऊन झालेल्या बेकायदेशीर उत्खनन पाहणी करून या बाबत शनिवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही माहिती सादर करून या खनिज चोरी आकाचा बंदोबस्त तसेच कायमस्वरूपी हे प्रकार बंद झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे शिवसेना तालुका प्रमुख पंचायत समिती उपसभापती गणेशप्रससाद गवस यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावात औद्योगिक विकास क्षेत्रात काही खनिज माफिया आका यांनी धुडगूस घातला आहे. चार ते पाच ठिकाणी बेकायदेशीर जमीन सपाटीकरण नावाखाली अवैध उत्खनन करून कोटी रुपये खनिज युक्त माती वाहतूक केली आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे. एवढया मोठया प्रमाणात खनिज चोरी केली जात असताना महसूल अधिकारी औद्योगिक विकास अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही तर खनिज माफिया याना पाठीशी घालत आहेत.
आडाळी औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे माती उत्खनन करण्यास परवानगी नाही.
एवढया मोठया प्रमाणात उत्खनन होऊन देखील महसूल अधिकारी कारवाई करू शकले नाही . त्याना दिसत नाही. असा सवाल केला.

खनिज उत्खनन बाबत स्थानिक वृत्तपञात बातम्या प्रसिद्ध झाल्या या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी आडाळी औद्योगिक क्षेत्रात पाहणी केली. गणेशप्रससाद गवस यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या सौ. साक्षी विशांत तळवडेकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा गवस, शिवसेना पदाधिकारी राजेंद्र निंबाळकर, विशांत तळवडेकर, भगवान गवस, बाबाजी देसाई, अनिल शेटकर, रामदास मेस्त्री, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा