सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी बदलली छताची कौले
दोडामार्ग, दि. २९ जून
पावसाळ्यात अंगणवाडीच्या छतातून पाणी गळत असल्याची तक्रार अंगणवाडी ताईंनी करताच ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेतली. शनिवार दि. 28 जून 2026 रोजी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रामपंचायत सदस्या सौ. नुतन पांगम व ग्रामस्थ मनोहर कदम यांनी स्वतः श्रमदान करून अंगणवाडीच्या छताची निघालेली व फुटलेली कौले बदलली.
अंगणवाडी म्हणजे गावातील 3 ते 6 वयोगटातील चिमुकल्यांचे दुसरे घर. पावसाळ्यात त्यांना त्रास होऊ नये, त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही स्वतः पुढाकार घेतला,” असे सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. पावसाळ्यापूर्वी अंगणवाडी दुरुस्त झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाही खुर्चीचा रुबाब, नाही भाषणांचा पाऊस..*
फक्त कृतीतून सेवा
*पदं मोठी नसतात,कामं मोठी असतात हे घोटगेवाडी ग्रामपंचायत यांनी दाखवून दिले.
