नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहतूक; कळणे येथे दाम्पत्याला धडक देऊन वाहन चालक पसार, कारवाईची मागणी
दोडामार्ग, दि. ८ सप्टेंबर
दोडामार्ग तालुक्यात सीएनएन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला लगाम घालायला वाहतूक अधिकारी दोडामार्ग पोलीस कमी पडत आहेत. नियम धाब्यावर बसवून वाहतूक केली जाते. दिवसरात्र सुसाट वाहने हाकली जातात माटणे येथे सीएनएन गॅस भरून बांदा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनाने मंगळवारी सकाळी माॅंनिग वार्कला बाहेर पडलेल्या कळणे येथील शरद नाईक त्यांच्या पत्नीला धडक देऊन पसार झाला यामुळे संतप्त झालेल्या कळणे सरपंच अजित देसाई, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल होऊन तातडीने कारवाई करून वाहन चालकाला हजर करा अशी मागणी केली.
दोडामार्ग तालुक्यातील माटणे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीएसटी पंपावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांना सीएसटी गॅस पुरवठा करण्यासाठी पंधरा ते वीस वाहने दिवसरात्र ये जा करतात या वाहनांवर पोलीस आर. टि ओ. यांचा अंकुश नाही उलट आशिर्वाद आहे. यामुळे चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. बेदरकारपणे वाहने चालवली जातात यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे.
सीएनजी गॅस वाहतूक करणारे