दोडामार्ग : तिलारी कालव्यांच्या पीव्हीसी पाइपलाइनला गळती; कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

शेअर करा

ठिकठिकाणी पाइप फुटल्याने वॉल लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया; निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

दोडामार्ग, दि. २२ सप्टेंबर

तिलारी जलसंपदा विभाग कडून तिलारी धरणाच्या डाव्या तसेच उजव्या कालव्यातून मायनर कालवे काढून या ठिकाणी पीव्हीसी पाईप लाईन जोडून कुडासे, मणेरी, सासोली, तसेच इतर गावात शेती बागायती करिता पाणी पुरवठा केला होता. यासाठी कोटयावधी रूपये खर्च केले. पण हे पाईप लाईन काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यामुळे ठिकठिकाणी पाईप फुटून वाॅल लिकेज होऊन मोठया प्रमाणात पाणी वाया जात आहे. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेअर करा