दोडामार्ग, दि. ५ जून
कोल्हापूर ते गोवा दरम्यान दुग्धजन्य पदार्थ वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर येथील एका वाहनाला
वझरे येथे धोकादायक वळणावर रस्ता अंदाज न आल्याने अपघात झाला सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. वाहनाचे पुढील भागाचे नुकसान झाले. शुक्रवारी पहाट हा अपघात घडला.
कोल्हापूर येथील वाहन दुग्धजन्य पदार्थ घेऊन गोवा येथे गेले होते माल विक्री करुन पुन्हा कोल्हापूर कडे जात असताना शुक्रवारी पहाटे वझरे येथे एका वळणावर वाहन रस्ता कडेला जाऊन धडकले. या अगोदर देखील या ठिकाणी अपघात घडले आहेत. बांधकाम विभाग यांनी काही रूंदीकरण केले होते. तरी येथे अपघात होतात.