दोडामार्ग, दि. २५ आॅगस्ट
कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांनी मंगळवारी दोडामार्ग वीज महावितरण कार्यालय येथे भेट देऊन गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील गावात वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन आवश्यक दुरुस्ती तातडीने करा वीज पुरवठा खंडीत झाला तर मनसेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.
दोडामार्ग येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दोडामार्ग वीज महावितरण कार्यालय मध्ये जाऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी समवेत चर्चा केली. गणेश चतुर्थी सणाच्या अकरा दिवस कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात काम करणारे कर्मचारी शाखा अभियंता याना सूचना द्या असे सांगितले.
ज्या गावात विधुत रोहित यंञ खराब झाली आहेत ती बदला काही ठिकाणी आजही वीज वाहिन्या वर झाडे फांद्या वाकून खाली आल्या आहेत यामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. ती झाडे फांद्या तोडायला सुरूवात करा काही ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होतो या ठिकाणी सुधारणा करा.
सद्या दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी गणेश मूर्ती रंगकाम वेग आला आहे. यावेळी वीजेची गरज आहे. मूर्ती रंगकाम खंड पडू नये यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा अशी मागणी केली.
यावेळी तालुका अध्यक्ष विनायक सावंत, शहर अध्यक्ष मधुसूदन खांबल, संदीप गवस पांडुरंग जाधव, दिलीप परिट, रामचंद्र बागकर, उमेश तळवडेकर, पुरूषोत्तम गवस उपस्थित होते. यावेळी मनसेच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले.