Dodamarg : दोडामार्ग–तिलारी विजघर रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक हैराण!

शेअर करा

सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पर्यायी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी; ठेकेदार आणि प्रशासनाच्या कामावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी.

दोडामार्ग, दि. २० आॅक्टोबर

दोडामार्ग ते तिलारी विजघर रस्ता काम करताना ये जा करणाऱ्या वाहन धारकांना पर्यायी सुरक्षित रस्ता देणे ठेकेदार प्रशासन यांची जबाबदारी आहे. पण या ठिकाणी सुरू असलेल्या कामावर सरकार लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने सर्व सामान्य जनता वाहन धारक हैराण झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी आंबेली कोनाळकरवाडी येथे रस्ता काम करताना पर्यायी रस्ता या ठिकाणी माती मारली. पडलेल्या पावसाने चिखल झाला या ठिकाणी खडी टाकून रस्ता मजबूत करा अशी मागणी करुन ठेकेदार याने दूर्लक्ष केले. यामुळे दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रस्ता कामासाठी सिमेंट केमिकल टॅंकर अडकून पडला यामुळे दोन्ही बाजूंनी अनेक वाहने बसेस अडकून पडल्या मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदाराच्या बेजबाबदार पुन्हा एकदा लोकांना फटका बसला.

दोडामार्ग ते तिलारी विजघर रस्ता सुरू असलेल्या कामाकडे इंजिनिअर ठेकेदार यांचे लक्ष नाही यामुळे काम करणारे कामगार आपली मनमानी करत आहेत. अगोदर रस्ता अपूर्ण असताना ते काम पूर्ण न करता पुढे पुढे रस्ता तोडला जात आहे. वाहन धारकांना जनतेला वेठीस धरले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना नाही माणसे नाही. बॅरिकेड नाही. यामुळे अपघात वाढले आहेत.
डांबरीकरण रस्ता तोडला जात आहे. हा रस्ता तोडताना पर्यायी रस्ता दोन वाहने सुटतील असा मजबूत पाहिजे पण एक वाहन सुरक्षित जावू शकत नाही अशी भयानक परस्थिती निर्माण झाली आहे. पर्यायी रस्ता हा मजबूत झाला पाहिजे पण फक्त माती टाकून रोलर फिरवला सोमवारी मोठया प्रमाणात पाऊस पडला चिखल झाला रस्त्यावर चर पडले समोर वाहन आले तर मोटार सायकल जावू शकत नाही. ही दखल घेऊन चिखल झाला तेथे खडी टाकून रोलिंग करणे आवश्यक होते पण संबंधित इंजिनिअर यांनी दूर्लक्ष केले.
आंबेली कोनाळकरवाडी येथे पर्यायी रस्ता चिखल झाला येथून मंगळवारी रस्ता सिमेंट काँक्रिट करण्यासाठी लागणारे सिमेंट केमिकल टॅंकर जात असताना तो पर्यायी रस्ता येथे झालेल्या चिखलात रूतला यामुळे दोडामार्ग ते तिलारी विजघर दिशेन ररस्ता नसल्याने अनेक एस टी बसेस तसेच इतर वाहने दुचाकी अडकून पडल्या जवळ जवळ पाऊण तास वाहने अडकून पडली. नंतर ठेकेदार कडून क्रेन पाठवून सिमेंट केमिकल टॅंकर बाजूला केला. जर चिखल झाला त्या ठिकाणी खडी टाकून रोलिंग करून रस्ता मजबूत केला असता तर ही वेळ आली नसती. बेजबाबदार पणे जनतेला वाहन धारकांना वेठीस धरणाऱ्या रस्ते विकास महामंडळ तसेच प्रशासन यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

शेअर करा