दोडामार्ग तालुक्यातील धोकादायक झाडे तातडीने तोडाराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

शेअर करा

दोडामार्ग,दि.१० ऑगस्ट

दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात जीर्ण झालेली आहेत काही झाडे वाकून खाली आली आहेत. यामुळे वाहन धारकांना नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. झाडे पडून जीवितहानी होवू शकते तेव्हा अशा घटना टाळण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्त्यावर आलेली धोकादायक झाडे. गणेश चतुर्थी पूर्वी तोडावी
असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरेशभाई दळवी, रामचंद्र चांदेलकर यांनी दिले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्त्यावर उदा. दोडामार्ग ते साटेली भेडशी, आवाडा, येळपर्ई, कोनाळकट्टा, तिलारी, मेढे, मुळस, घाटीवडे, विजघर, बांबर्डे, दोडामार्ग ते आयी, दोडामार्ग ते बांदा मार्गावर शेकडो झाडे धोकादायक स्थितीत आहेत.
दोडामार्ग ते विजघर रस्ता रूंदीकरण सुरू आहे. रस्ता निर्माण विभाग यांनी झाडे तोडणे आवश्यक आहे. काही झाडे ही वाळली आहेत तुकडे पडले आहेत.

गणेश चतुर्थी सण तोंडावर आला आहे. यामुळे मोठया प्रमाणात चाकरमानी गावी येतात शिवाय या मार्गावर वाहतूक वाढली आहे. तेव्हा दोडामार्ग तालुका तहसीलदार म्हणून संबधित अधिकारी, ठेकेदारांना सूचना देऊन तातडीने झाडे तोडून संभाव्य धोका किंवा जीवितहानी टाळावी अशी मागणी सुरेशभाई दळवी, रामचंद्र चांदेलकर यांनी दोडामार्ग तहसीलदार कडे केली आहे. 

शेअर करा