दोडामार्ग : दोडामार्ग–विजघर रस्ता कामातील हलगर्जीपणामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात

शेअर करा

मोरी दुरुस्ती अपूर्ण ठेवून रस्त्यावर खड्डे व चिखल; ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप

दोडामार्ग, दि. १० जून

दोडामार्ग ते विजघर रस्ता काम सुरू आहे. या कामावर प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष नाही . यामुळे ठेकेदारांनी आपला मनमानी कारभार करत वाहन धारक नागरिक यांचा जीव धोक्यात आणला आहे. रस्त्यावर असलेल्या मोऱ्या पाईप काढून नवीन पाईप टाकल्यावर आवश्यक मोरी दुरुस्ती सिमेंट काँक्रिट खडी टाकली नाही यामुळे आंबेली दोडामार्ग येथे मोठे खड्डे चिखल झाला आहे. वाहन धारकांना कसरत करावी लागते, ठेकेदाराच्या निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर बेतू शकतो तरी संबंधित ठेकेदाराने उपाययोजना केली नाही.

दोडामार्ग ते तिलारी दरम्यान रस्ता काम सुरू आहे. या रस्त्यावर जुन्या मोऱ्या  पाईप काढून नवीन पाईप टाकण्यासाठी रस्ता खोदला यावर माती भराव टाकून रस्ता झाकून घेतला पण पाऊस सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी रोलिंग करून सिमेंट काँक्रिट टाकून रस्ता खचणार नाही खड्डे पडणार नाही, चिखल होणार नाही याची काळजी संबंधित ठेकेदार याने घेतली पाहिजे पण काही उपाययोजना केली नाही. यामुळे सुरू झालेल्या पावसाने मोऱ्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडून चिखल झाला आहे लहान वाहने अडकत आहेत. 

संबंधित ठेकेदार कामगार याना याची कल्पना करून दिली तरी या ठिकाणी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही यामुळे वाहन धारक नागरिक हैराण झाले आहेत. सदर ठेकेदार यांच्यावर सरकारचा अंकुश नाही शिवाय दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधी याना जनता वाहन धारक यांचे काही पडलेले नाही यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहे. असे एकंदर चिञ बघायला मिळत आहे.
आंबेली ते दोडामार्ग दरम्यान चार ठिकाणी ही धोकादायक स्थिती निर्माण करुन ठेवली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी सिमेंट काँक्रिट खडी टाकून रस्ता करून पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती तेव्हा संबंधित रस्ता अधिकारी यांनी ठेकेदार याना पाठीशी न घालता जनतेला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांना योग्य समज देऊन गैरसोय दूर करा अशी मागणी केली जात आहे.

शेअर करा