नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मुंबईत घेतली भेट; हरकतींची माहिती दिल्यानंतर न्याय्य आराखडा मंजूर करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
दोडामार्ग,दि.०७ ऑगस्ट
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कडून तयार केलेला प्रारूप आराखडा हा चूकिचा आहे. याबाबत अनेक जणांनी हरकती नोंदवल्या होत्या हा आराखडा जनतेवर अन्याय होणारा आहे. तेव्हा तो मंजूर करु नये असे सुचवले होते. कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत आराखडा बाबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मुंबई येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विकास आराखडा हरकती तसेच सद्य स्थिती कथन केली यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कसर्ई दोडामार्ग शहरातील ग्रामस्थ यांच्यावर कुणालाही अन्याय होणार नाही. अशा प्रकारचा प्रारूप आराखडा मंजूर करून घेतला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात तयार केलेला विकास आराखडा हा अन्याय कारक आहे. अनेकांच्या हरकती आहेत या पार्श्वभूमीवर कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिपक गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, दोडामार्ग भाजप उप तालुका प्रमुख आनंद तळणकर, यांनी मुंबई येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन प्रारूप आराखडा बाबत चर्चा केली.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहरातील नागरिकांच्या विकास आराखड्याबाबतच्या हरकती तसेच सद्यस्थितीबाबत मा. पालकमंत्री याना माहिती दिली. शहरातील नागरिकांच्या प्रारूप विकास आराखड्याबाबतच्या संदर्भातल्या मागण्या पूर्ण करून देणेबाबत सकारात्मक चर्चा केली, तरी सदरच्या सर्व हरकती विचारात घेऊनच नागरिकांवर या प्रारूप विकास आराखड्यामुळे अन्याय होणार नाही अशा स्वरूपाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला जाईल अशी ग्वाही मा. पालकमंत्री राणे यांनी दिली संपूर्ण दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतची हमीदेखील याप्रसंगी पालकमंत्री यांनी दिली