दोडामार्ग, दि. २५ आॅगस्ट
जंगली हत्ती वावर असलेल्या मोर्ले गावात सोमवारी रात्री उशिरा मोर्ले गावातील रहिवासी रमेश गवस यांच्या घरात जंगलातून आलेल्या खवले मांजराने थेट घरात शिरकाव करून घरातील फ्रिज खाली आसरा घेतला. यामुळे रमेश गवस तसेच घरातील लोकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोपाळ गवस, संतोष मोरये, इतर ग्रामस्थ दाखल झाले. खवले मांजर याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता त्याला फ्रीज खाली ठेवले दोडामार्ग वन विभाग याना माहिती दिली.
मंगळवारी सकाळी दोडामार्ग वन विभाग क्षेञपाल संभाजी पाटील इतर वन कर्मचारी मोर्ले गावात गेले या नंतर हे खवले मांजर वन विभाग यांच्या स्वाधीन केले या नंतर वन जंगलात आदिवासात सोडण्यात आले.