खोकरल-मांगेली मार्गावर कोंबून भरलेला जनावरांचा टेम्पो पकडला; गाय, बैल व वासरांची गोशाळेत रवानगी करण्याची प्रक्रिया सुरू
दोडामार्ग,दि.१० ऑक्टोबर
दोडामार्ग मधून मोठया प्रमाणात पाळीव गुरे कत्तल खान्यात बेळगाव मध्ये नेली जातात यामागे दोडामार्ग तालुक्यातील तसेच घाटमाथ्यावरील एक टोळी कार्यरत आहे. शनिवारी दोडामार्ग मधून पाळीव जनावरे टेम्पो मधून खोकरल मांगेली अशी वाहतूक होणार अशी पक्की खबर दोडामार्ग पोलीस निरीक्षक याना मिळाली या नंतर दोडामार्ग पोलिसांनी खोकरल मांगेली रस्त्यावर फिल्डिंग लावली आणि बेकायदेशीर गुरे वाहतूक करणारा टेम्पो आढळून आला यावेळी गाय बैल वासरू याना जागा नाही अशा पध्दतीने खचाखच भरण्यात आले होते. या
प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक करून टेम्पो ताब्यात घेतला
तर गुरांना गो शाळेत पाठवणे प्रक्रिया सुरू होती.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस
पोलीस राजेश नाईक, पोलीस जाधव, साटेलकर, गावडे, यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.
पोलिसांनी पकडलेली गुरे जर्सी गाय बैल वासरू समावेश आहे
सायंकाळी उशिरा ही कारवाई केली खोक्रल येथील वळणावर संशयित आरोपी दिपक रामा गावडे, वय ४२ , रा. हंबनहट्टी, जांबोटी, ता. खानापुर, जि. – बेळगाव, . संतोष गणपती घाडी, वय 32 वर्षे, रा.. हंबनहट्टी, जांबोटी, ता. खानापुर, जि. बेळगाव, ताब्यातील सफेद रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप KA 22 AA 8004 ताब्यात घेतला याची किंमत तीन लाख रुपये आहे. वरील वाहनात
निर्दयीपणे, कुरपणे, दाटीवाटीने कोंबुन त्यांच्या चा-या पाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करीत असताना वाहतूक करत होते कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (d), 11 (1) (e), 11 (1) (h), मोटर वाहन अधिनियम कलम 66/192, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल केला.