दोडामार्ग, दि. १० जून
मंगळवारी रात्री उशिरा साटेली भेडशी धनगरवाडी येथे रस्ता कडेला उभा असलेला सिमेंट वीज खांब खालून तुटून पडल्याने धनगरवाडी विमानतळ येथील वीज पुरवठा बंद पडला यामुळे गैरसोय झाली. दोडामार्ग तिलारी मुख्य रस्त्यावर हा खांब पडून वीज तारा यामुळे लोंबकळत राहिला सुदैवाने वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला. वीज कर्मचारी यांना कळवून वीज पुरवठा बंद करण्यात आला.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात लोखंडी वीज खांब ऐवजी आता सिमेंट खांब वापरले जात आहेत पण सिमेंट खांब निकृष्ट दर्जाचे ठेकेदार कडून वापरले जातात पण वीज महावितरण अधिकारी याबाबत मुग गिळून गप्प बसतात यामुळे सिमेंट खांब तुटून पडत आहेत.