दोडामार्ग बाजारपेठ मधिल सुलभ शौचालय बंद नागरीकांचे हाल नगरपंचायत लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दूर्लक्ष

शेअर करा

दोडामार्ग, दि. ७ सप्टेंबर

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, यांचे लक्ष नसल्याने दोडामार्ग बाजारपेठ मधिल जनतेला अत्यावश्यक असलेले सुलभ शौचालय गेले सहा दिवस बंद आहे. यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. नगरपंचायत यांनी दूर्लक्ष केले आहे. गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर जनतेची गैरसोय केली जात आहे. जनतेच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
कसर्ई दोडामार्ग बाजारपेठ मधिल सुलभ शौचालय बंद असते अशा वेळी मासळी मार्केट मधिल सुलभ शौचालय सुरू ठेवून तसे सुचना फलक लावले पाहिजे पण ते देखील बंद ठेवले आहे पर्यायी सोय नसल्याने विशेष करून महिलांची गैरसोय होत आहे.

दोडामार्ग बाजारपेठ मधिल सुलभ शौचालय टाक्या भरल्या आहेत. सक्शन व्हॅन उपलब्ध असून देखील साफसफाई नाही शिवाय नळाचे पाईप गाळाचे भरले आहेत. पाणी पडत नाही हि बाब देखील या ठिकाणी काम करणारे सफाई कामगार यांनी निदर्शनास आणून दिली. कारागीर याला सूचना देऊन देखील दुरुस्ती नाही यामुळे हे सुलभ झाले सहा दिवस झाले बंद आहे.

दोडामार्ग बाजारपेठ मोठया प्रमाणात बाहेरील तसेच स्थानिक लोक येतात यांच्या सोयीसाठी बाजारपेठ जे सुलभ शौचालय आहे ते सोयीस्कर आहे. सफाई कामगार आपले काम करतात येथील समस्या निदर्शनास आणून देतात सुलभ शौचालय मधिल समस्या उदा. पाणी येत नाही, टाक्या भरल्या आहेत याची साफसफाई करणे नेमलेल्या व्यक्ती याची जबाबदारी आहे. पण लक्ष दिले जात नाही.
दोडामार्ग बाजारपेठ मधिल सुलभ शौचालय बंद आहे. याबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, याना माहिती दिली पण अद्याप सुलभ शौचालय साफसफाई नाही पाणी पडत नाही यामुळे ते बंद ठेवले आहे यामुळे मोठी गैरसोय होत आहे. नगरपंचायत यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेअर करा