दोडामार्ग : घोटगेवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

शेअर करा

दोडामार्ग, दि. २८ जून
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दि. २८ जून २०२६ रोजी जि.प. दवाखाना घोटगेवाडी येथे सकाळी आठ वाजता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे व वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन शर्मा यांच्या हस्ते 5 वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मोठ्या संख्येने माता व पालक उपस्थित होते.
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, “एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.” सरपंच श्री. शेटकर यांनी सर्व पालकांना आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले. सकाळी 8:00 ते सायं.5 वाजेपर्यंत जि.प.दवाखान्यात लसीकरण सुरू राहणार आहे.

शेअर करा