ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहनचालकांना फटका; अर्धा तास वाहने अडकून पडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त
दोडामार्ग, दि. १७ आॅक्टोबर
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ वतीने दोडामार्ग ते विजघर रस्ता सिमेंट काँक्रिट गरज नसताना घाट घातला गेला आहे. हा रस्ता करताना ठेकेदार कडून खबरदारी घेतली जात नाही. शिवाय देखरेख करण्यासाठी अधिकारी नाही यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. रस्ता काम करताना दोन वाहने सुटतील असा सुरक्षित रस्ता नाही यामुळे शनिवारी सायंकाळी कोनाळकट्टा येथे ठेकेदाराच्या बेजबाबदार चक्काजाम वाहतूक कोंडी होऊन अर्धा तास वाहने अडकून पडली. मोठया गैरसोयीचा सामना करावा लागला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
दोडामार्ग ते तिलारी रस्ता काम पावसाळ्यापूर्वी केलेला रस्ता साईडपट्टी इतर कामे अपूर्ण आहेत ही पूर्ण करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदार कामगार यांनी आंबेली दोडामार्ग दिशेने डांबरीकरण रस्ता तोडायला सुरुवात केली या ठिकाणी पर्यायी रस्ता सुरक्षित नाही माती खडी टाकून पर्यायी रस्ता सुरक्षित करणे जबाबदारी ठेकेदार याने झटकली आहे. खड्डयातून प्रवास करावा लागतो. पाणी मारले जात नाही ठिकठिकाणी अडथळा निर्माण करुन जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कोनाळकट्टा येथे अगोदर रस्ता अरूंद आहे. दोडामार्ग ते तिलारी विजघर रस्ता कोल्हापूर बेळगाव गोवा रस्ता आहे. यामुळे वाहनांची वर्दळ जास्त असते याचा विचार करून वाहने सुटतील असा रस्ता ठेवला पाहिजे असे न करता रस्ता खोदकाम सुरू केले यामुळे शनिवारी सायंकाळी मोठया प्रमाणात वाहने प्रवासी वाहतूक बसेस अडकून पडल्या नागरीकांची मोठी गैरसोय झाली पण ठेकेदार कडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अखेर स्थानिक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांनी वाहतूक कोंडी सोडवली बेजबाबदार ठेकेदार कामगार यांच्या या निष्काळजीपणा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दोडामार्ग ते तिलारी रस्ता काम अपूर्ण ठेवून आंबेली दोडामार्ग दिशेने रस्ता तोडणे हे काम तातडीने बंद करावे. अगोदर झरेबांबर साटेली भेडशी आवाडा, तिलारी रस्ता काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे. रस्ते विकास महामंडळ अधिकारी यांनी या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.