रानभाज्यांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी केली विक्री; ‘गावठी रानभाज्या घ्या’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
दोडामार्ग,दि.०९ ऑगस्ट
पावसाळ्यात मोठया प्रमाणात रानभाज्या उगवतात या रानभाज्या नैसर्गिक रित्या उगवतात या भाज्या आरोग्यास चांगल्या असतात पूर्वीपासून याचा वापर जेवणात करत आले आहेत. आज मोठया प्रमाणात जंगल तोड डोंगर साफसफाई यामुळे रानभाज्या कमी होत चालल्या तरी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आजही मोठया प्रमाणात रानभाज्या तसेच कनक, चिवार, कोंब, देखील चवीने खातात. सासोली जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी रानभाज्या बाजार मांडून रानभाज्या विक्री केली. रानभाज्या यांचे महत्त्व पटवून दिले. भाजी घ्या भाजी गावठी रानभाज्या घ्या. अशा घोषणा देखील दिल्या.
सासोली जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शालेय मुलासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुलांना पावसाळ्यात आढळून येणाऱ्या रानभाज्या याची ओळख तसेच या रानभाज्या खाण्याने आरोग्यासाठी फायदे, नैसर्गिक रित्या निर्माण झालेल्या रानभाज्या किती उपयुक्त असतात याची माहिती मुलांना झाली पाहिजे यासाठी रानभाज्या बाजार मांडला होता
मुलांनी मांडलेला रानभाज्या बाजार याला सासोली गावातील ग्रामस्थ पालक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी भाज्या खरेदी केल्या.
सासोली जिल्हा परिषद शाळा नंबर एक यांनी रानभाज्यांचा बाजार…मांडला..या बाजाराला स्वतः गट विकास अधिकारी दोडामार्ग श्री अजिंक्य सावंत तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी श्री यशवंत गवस विस्तार अधिकारी श्री तायडे सर यांनी या बाजाराला भेट दिली. व मुलांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मुलांचे कौतुकही केले व या रानभाज्यांची खरेदी पण त्यांनी केली.शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या संकल्पनेतून हा बाजार मांडला पालकांचे सहकार्य लाभले.
