दोडामार्ग : कोनाळकट्टा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर उर्फ बाप्पा पोकळे यांचे निधन

शेअर करा

दोडामार्ग, दि. १४ आॅगस्ट

कोनाळकट्टा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शासकीय ठेकेदार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रभाकर उर्फ बाप्पा अनंत पोकळे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोल्हापूर येथे उपचार दरम्यान शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना नातवंडे, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडामार्ग तालुक्यातील गावागावात बाप्पा पोकळे म्हणून त्यांची ओळख होती सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा सहभाग असायचा. दोडामार्ग तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते कोनाळ माजी उपसरपंच परेश पोकळे यांचे ते वडील होते

शेअर करा