दोडामार्ग बाजारपेठेत रस्त्यावर सिमेंट काँक्रिट खडी टाकणाऱ्या मिक्सर वाहनांवर कारवाई करा

शेअर करा

दोडामार्ग,दि.०४ ऑगस्ट

दोडामार्ग ते तिलारी मार्गावर गोवा येथील अनेक सिमेंट काँक्रिट मिक्सर वाहने ये जा करतात या वाहनांमध्ये भरलेले सिमेंट काँक्रिट खडी खाली पडू नये यासाठी संबंधित वाहन चालक कडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही यामुळे या मिक्सर वाहनातील सिमेंट काँक्रिट हे रस्त्यावर पडून यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत तेव्हा बेशिस्त सिमेंट काँक्रिट मिक्सर वाहनांवर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
गोवा दोडामार्ग तिलारी दरम्यान पावसाळ्यात देखील सिमेंट काँक्रिट मिक्सर वाहने बेजबाबदार पण सुरू आहेत. सदर चालक आपला मनमानी कारभार करत आहेत, सिमेंट काँक्रिट भरलेले चार पाच वाहने ये जा करतात यावेळी गाडी उभी केली की आतील सिमेंट काँक्रिट मिक्सर मधून चक्क रस्त्यावर पडत आहेत.
दोडामार्ग ते तिलारी मार्गावर अनेक ठिकाणी अशा प्रकारे खडी सिमेंट काँक्रिट रस्त्यावर थर पडलेला बघायला मिळतो यात दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. मंगळवारी देखील मोठया प्रमाणात सिमेंट काँक्रिट मिक्सर मधून रस्त्यावर पडले यामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागली. तेव्हा दोडामार्ग पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

शेअर करा