Dodamarg : जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा हत्ती उपाययोजना नावाखाली कोटी रुपये लुट थांबवा

शेअर करा

हत्ती नुकसान भरपाई खोटे पंचनामे छेडछाड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे संबंधित जबाबदार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फे करा

मागणी करत शेतकरी बांधवांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालय समोर सुरू केले उपोषण

विरोधी पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पाठिंबा

दोडामार्ग,२१ आॅक्टोबर

दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे हत्ती बाधित क्षेत्रात ञिस्तरीय समिती कडून खोटे पंचनामे त्यात झालेली छेडछाड हत्ती उपाययोजना नावाखाली कोटी रुपये लुट थांबवा माहिती अधिकार खाली माहिती देण्यास नकार देणाऱ्या तसेच हत्ती नुकसान भरपाई बाबत खोटे पंचनामे छेडछाड प्रकरणाची चौकशी तसेच याला जबाबदार वन अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकारी यांनी सेवेतून बडतर्फे करा अशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी हेवाळे बांबर्डे गावातील शेतकरी यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे उपोषणाला सुरुवात केली आहे.विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे.


दोडामार्ग वन विभाग कार्यालय बांबर्डे हेवाळे गावातील शेतकरी दौलतराव राणे, मदन राणे, सिध्देश राणे, इतरांनी उपोषण सुरू केले आहे. याला शिवसेना ठाकरे, संजय गवस, विनिता घाडी, जेनिफर लोबो, राणे, ओंकार कासार, तसेच राष्ट्रीय काँग्रेस बाबू गवस, बाळा धाऊसकर, शेतकरी फळ बागायतदार संघटना अध्यक्ष संजय देसाई, नगरसेवक चंदन गावकर, सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, भिमराव राणे, विलास सावळ इतरांनी पांठीबा दिला आहे. याबाबत दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील समवेत देखील उपोषण कर्ते यांनी चर्चा केली.

शेअर करा