तीन ते चार शिक्षक अनुपस्थित असल्याचा आरोप; खुलासा न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा इशारा
दोडामार्ग, दि. ७ जुलै
दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील कोलझर समाज सेवा हायस्कूल मध्ये मंगळवारी गावातील मुलांचे पालक ग्रामस्थ यांनी सभेच्या निमित्ताने भेट दिली असता या ठिकाणी तीन ते चार शिक्षक गैरहजर असल्याचे आले. याबाबत पालकांनी सदर शिक्षक हजर का? नव्हते याबाबत मुख्याध्यापक यांनी खुलासा करावा नाहीतर मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा दिला आहे.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेत पुरेसे शिक्षक असणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी भेट दिली असता रजिस्टर प्रमाणे पांगुळ, पाटील, दळवी, मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे दिसून आले. याबाबत पालकांनी शाळेला लेखी पञ देत याबाबत खुलासा करावा असे मुख्याध्यापक याना दिले आहे.
यावेळी संजय देसाई, विलास सावळ, यशवंत घोगळे, लक्ष्मी डांगी, नामदेव मळीक, शिल्पा देसाई, मानसी देसाई, तनिष्का मुंगी, निशा कासकर, वंदना कासकर, अंजू रेडकर, स्वरदा बोंद्रे, संजना देसाई, मोहीनी देसाई, वैभव डांगी इतर पालक उपस्थित होते.