दोडामार्ग : तिलारी घाटात जयकर पाॅईंट वळणावर टेम्पो पलटी

शेअर करा

दोडामार्ग, दि. १६ सप्टेंबर

गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर, असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात पुन्हा एकदा मालवाहतूक वाहने अपघात वाढले आहेत. गेल्या आठवडयात एक वाहन घाट उतरून खाली येताना जयकर पाॅईंट वळणावर अंदाज न आल्याने खाली गेला होता दरीत कोसळता वाचला होता. या जयकर पाॅईंट वळणावर अंदाज न आल्याने पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील मालवाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. सुदैवाने कुणाला काही झाले नाही. टेम्पोचे नुकसान झाले. नंतर हा टेम्पो टॅक्टर आणून काढण्यात आला.

शेअर करा