दोडामार्ग : पडवे माजगाव येथे वाघांची दहशत चरायला सोडलेल्या गायीचे तोडले लचके परिसरात भितीचे वातावरण

शेअर करा

दोडामार्ग, दि. ११ आॅगस्ट

दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव नजीकच्या माळरानावर चरायला सोडलेल्या महेश देसाई यांच्या गायीवर भरदिवसा पट्टेरी वाघाने हल्ला चढवून गायीचे लचके तोडले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वन विभाग याना देतात वन विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिवसाढवळ्या अशा प्रकारे हल्ला झाला यामुळे या भागातील शेतकरी बांधवात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग यांनी याची दखल घेऊन या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. इतर पाळीव जनावरे सोडणे मुश्किल झाले आहे. हा वाघ पुन्हा हल्ला करु शकतो अशी भीती निर्माण झाली आहे.

शेअर करा