तिलारी घाटात बेवारस स्थितीत टाकलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाअन्वेषण विभागाची मोठी कामगिरी; तपासात यश मिळवणाऱ्या पोलीस पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ₹५० हजारांचे बक्षीस जाहीर
दोडामार्ग, दि. ११ जून
कर्नाटक राज्यातून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात खून करून मृतदेह टाकलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटली असून तिचे नाव गंगव्वा सत्यप्पा हंजीमणी वय वर्षे २७ रा. वंटमोरी जिल्हा बेळगाव असे असून तिच्या खून प्रकरणी
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी अंत्यत गुंतागुंतीचा विषय असलेल्या खूनाचा जलदगती तपास करत या खून प्रकरणी हुक्केरी तालुक्यातील तीन जणांना बेढया ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या कामगिरी बद्दल कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकाला पन्नास हजार बक्षीस जाहीर केले आहे.
गोवा दोडामार्ग ते बेळगाव, कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात या अगोदर देखील अशा खूनाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या २९ मे रोजी तिलारी घाटात प्रेशर पाॅईट पाईप लाईन नजीकच्या झाडा झुडपात अनोळखी महिलेचा सोडलेला मृतदेह आढळून आला होता यामुळे खळबळ उडाली होती. मृतदेह ओळख पटत नव्हती. चंदगड पोलिसांसमोर आवाहन होते. तपास करण्यासाठी तिच्या अंगावरील दागिने सार्वजनिक केले होते.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली या कामी सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर काही गोष्टी तपासाला यश मिळत गेले आणि संशयित आरोपी कडील फास अधिक आवळला गेला.
गंगव्वा सत्यप्पा हंजीमणी हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला जखम होती हे समोर आले होते यामुळे हा खूनाचाच प्रकार याची खात्री झाली होती. अज्ञात आरोपी विरूद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.