पावसात माती भराव टाकून रस्ता धोकादायक; वाहने चिखलात अडकली, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
दोडामार्ग, दि. ९ जून
दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान रस्ता काम करताना संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार यांनी उसप तिठा साटेली भेडशी येथे मुख्य रस्त्यावर पाऊस सुरू झाला असताना मोरी बांधकाम हाती घेतले पण वाहतूक व्यवस्था याबाबत ठोस उपाययोजना न करता केवळ माती भराव टाकून दोन्ही बाजूंनी रस्ता धोकादायक करून ठेवला झालेला चिखल यामुळे काही गाडया अडकून पडल्या ठेकेदार याच्या निष्काळजीपणा बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी खडी सिमेंट काँक्रिट टाकून वाहतूक व्यवस्था सुरळीत करा या लोकांच्या सूचना याकडे दुर्लक्ष केले करतो असे सांगून दिशाभूल केली. पावसाळ्यात धोका निर्माण करणाऱ्या संबंधित ठेकेदार याना तहसीलदार यांनी योग्य सूचना कराव्या अशी मागणी केली जात आहे.

साटेली भेडशी उसप तिठा पांडुरंग नाईक यांच्या दुकान जवळ मोरी बांधकाम करायला पाहिजे याची जाणीव संबंधित ठेकेदार याना होती पण काम सुरू होऊन सहा महिने झाले या कालावधीत मोरी बांधकाम हाती घेतले पाहिजे याचे शहाणपण सूचले नाही आणि पाऊस सुरू झाला तेव्हा रस्ता मोरी खोदून धोका निर्माण करून ठेवला माती भराव टाकून रस्ता चिखलमय झाला एकेरी वाहतूक दोन्ही बाजूंनी धोका वाहन पलटी होण्याची शक्यता.
साटेली भेडशी उसप तिठा पांडुरंग नाईक यांच्या दुकान समोर मोरी बांधकाम योग्य नाही रस्ता खोदून पाईप टाकले खाली खडी सिमेंट काँक्रिट काही टाकले नाही. लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. रस्ता केला साईड पट्टी माती भराव पडत असलेल्या पावसाने वाहुन जाण्यास सुरुवात झाली आहे.
दोडामार्ग ते साटेली भेडशी आवाडा दरम्यान काही ठिकाणी धोका निर्माण करुन ठेवला आहे. मोऱ्या बांधकाम केले पण पाणी जाण्यासाठी गटार उघडे केले नाही यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. पण लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे लक्ष देत नाही यामुळे ठेकेदार यांच्या मनमानी कारभार यामुळे प्रवास करणारे वाहन धारक भरडले जात आहेत.